दामदुप्पटीच्या आमिषाने गंडवले : नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून दोन वाहने जप्त

जळगाव : नाशिकच्या माऊली पतसंस्था व संकल्प सिध्दी प्रॉडक्टस कंपनीने गुंतवलेल्या पैशांवर दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून नाशिक, धुळे, जळगाव तसेच अहमदनगरातील गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातल्यानंतर नाशिकमध्ये गुन्हा दाखल होताच नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पतसंस्थेच्या एजंटांना उद्दिष्टपूर्तीबद्दल मिळालेल्या महागड्या दोन कार जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. संस्थापक विष्णू भागवत व अन्य संचालकासह दोनही कंपन्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, उद्दिष्ट पूर्ण करणार्या एजटांना दिलेल्या महागड्या दोन कार नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रूपेश केदार यांनी शनिवारी जळगावमधून जप्त करून रामानंदनगर पोलिसात लावल्या असून यातील एक वाहने हे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी वापरत असल्याची चर्चा आहे.


