धुळ्यात गुंगीकारक औषधांची विक्री : लाखाच्या साठ्यासह तिघे जाळ्यात


Sale of narcotic drugs in Dhule : Three arrested with stock worth Rs.One lakh धुळे : मानवी मेंदूवर परीणाम करून गुंगी आणणार्‍या औषधांची विक्री करणार्‍या तिघांच्या धुळे शहर पोलिसांनी मुसक्या बांधत दोन दुचाकींसह 98 हजारांचा औषध साठा जप्त केल्याने नशेखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
धुळे शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. शाबीर शाह भोलू शहा, कलीम शहा सलीम शहा, सद्दाम हुसेन फरीद अन्सारी (धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
संशयीत दोन दुचाकींद्वारे मालेगाव रोडने धुळे शहरात मानवी शरीरासह मेंदुवर परीणाम होणार्‍या गुंगीकारक औषधांच्या बाटल्या विक्रीसाठी आणत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे स्टेशनजवळील खांडल विप्र भवनजवळ ही कारवाई करण्यात आली. 48 हजार रुपये किंमतीच्या 300 प्लास्टीक बाटल्यांसह तीन मोबाईल, दोन हजार दोनशे रुपयांची रोकड तसेच दोन दुचाकी असा एकूण 98 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहा.पोलीस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी, धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत राठोड, विजय शिरसाठ, मच्छिंद्र पाटील, कुंदन पटाईत, महेश मोरे, मनीष सोनगीरे, प्रवीण पाटील, अविनाश कराड, निलेश पोतदार, तुषार मोरे, प्रसाद वाघ, शाकीर शेख, गुणवंतराव पाटील, किरण भदाणे, शाकीर शेख आदींनी अन्न औषध निरीक्षक किशोर देशमुख आदींच्या उपस्थितीत केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !