‘मोदी’ नावावरील टिका भोवली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी अखेर रद्द
Congress leader Rahul Gandhi’s candidature cancelled action taken by Lok Sabha Speaker दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा अध्यक्षांनी रद्द केल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. अलीकडेच सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना मोदी नावावर टिका केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती व या शिक्षेनंतरही ही कारवाई लोकसभा अध्यक्षांनी केली आहे.
सदस्यत्व रद्दने खळबळ
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, जर कोणत्याही परीस्थितीत खासदार आणि आमदारांना दोन वर्षांहून अधिकची शिक्षा ठोठावण्यात आली असेल तर त्यांचे सदस्यत्व (संसद आणि विधानसभा) रद्द केले जाते. इतकेच नव्हे तर शिक्षेची मुदत पूर्ण केल्यानंतर त्यांना सहा वर्षांपर्यंत निवडणुका लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते त्यामुळे सध्या त्यांची खासदारदी रद्द करण्यात आली आहे.




‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते?’
राहुल गांधी यांनी 2019 मध्ये कर्नाटकात बोलताना एक वक्तव्य केले होते. ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते?’ असे राहुल म्हणाले होते. राहुल यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार पुर्निश मोदी यांनी त्यांच्यावर एक खटला दाखल केला होता. गुरुवारी सूरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. पण, राहुलला त्वरीत कोर्टाकडून 30 दिवसांचा जामीन मिळाला.
सोशल मीडिया प्रोफाईल फोटो बदलले
राहुल गांधी यांच्याभोवती सुरू असलेल्या विविध वादांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने काल आपल्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवरील प्रोफाइल फोटो बदलला आहे. या प्रोफाइल फोटोमध्ये राहुल गांधींचा फोटो लावण्यात आला असून, त्यावर डरो मत असे लिहिण्यात आले. हा फोटो ट्विटर, फेसबूक अशा सर्व सोशल मीडिया अकाउंट्सवर टाकण्यात आला आहे.