धुळ्यात गुंगीकारक औषधांची विक्री एकाला अटक


One arrested for selling narcotics in Dhule धुळे : शहरात गुंगीकारक औषशांची विना परवानगी विक्री करणार्‍या एकाच्या आझादनगर पोलिसांनी मुसक्या बांधल्या आहेत. फैजान उर्फ इन्न्या अहमंद मुझम्मिल अन्सारी (चाँदतारा चौक, मौलवीगंज, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. नटराज टॉकीज ते निळा चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर संशयीत औषधांची विक्री करताना आढळल्याने त्यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून चार हजार 885 रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहा.पोलिस अधीक्षक एस.ऋषिकेश रेड्डी, गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील सहाय्यक निरीक्षक दीपक पावरा, योगेश शिरसाठ, प्रकाश माळी, राजु देसले, संदीप कढरे, चंद्रकांत पाटील, योगेश शिंदे, आतीक शेख, सुशी शेंडे, अजहर शेख, शोएब बेग, सिध्दांत मोरे, संतोष घुगे, प्रमोद खैरनार यांनी ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !