रावेर आगारातील दोघा वाहकांच्या सेवा समाप्त

रावेर : एस टी आगारातील वाहक आर.पी.गाढे व एस.पी.पवार या वाहक कर्मचार्यांच्या सेवा समाप्त करण्याबाबत आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे यांनी आदेश काढला आहे. रावेर आगारात आर.पी.गाढे व एस.पी.पवार हे वाहक या पदावर कार्यरत असताना ते एस.टी.महामंडळाची प्रतिमा समाजात खराब होईल, असे वर्तन करीत होते. त्यांच्या कामात व वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करीत त्यांची सेवा समाप्त करण्याचा प्रस्ताव विभागीय नियंत्रकांकडे पाठविला होता. त्यानुसार या दोन्ही वाहकांच्या सेवा समाप्त करण्याबाबतचा अभिप्राय आगार व्यवस्थापक यांना पाठविण्यात आल्याने वाहक आर.पी.गाढे व एस.पी.पवार या दोन्ही वाहक कर्मचार्यांच्या सेवा आगार व्यवस्थापक बेंडकुळे यांनी समाप्त केल्या आहेत.


