एरंडोलनजीक कंटेनर-टँकरमध्ये भीषण अपघात : दोन्ही चालक ठार


Fatal accident in container-tanker near Erandol : Both drivers killed एरंडोल : औषधी वाहून नेणार्‍या कंटेनर व टँकरमध्ये समोरा-समोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार झाले. अपघातानंतर कंटेनरने पेट घेतल्यामुळे कंटेनरमधील लाखोंचा औषधीसाठा जळून खाक झाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पिंपळकोठा गावाजवळील हॉटेल नॅशनल पंजाबसमोर मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. बिंदू मेहताब देहारीया व संतोषकुमार राजाराम यादव असे ठार झालेल्या चालकांची नावे आहेत.

समोरा-समोर धडकली वाहने
पिंपळकोठा गावाजवळील पेट्रोल पंपासमोर धुळ्याकडून जळगावकडे जात असलेल्या टँकर क्रमांक (एम.एच.34 बी.जी. 9837) ला जळगावकडून धुळ्याकडे जात असलेल्या कंटेनर (क्रमांक एन.एल.01 क्यू 7151) ने समोरून जोरदार धडक दिल्यानंतर औषधांच्या कंटेनरने पेट घेतला तसेच दोन्ही वाहनाचे चालक बिंदू मेहताब देहारीया व संतोषकुमार राजाराम यादव गंभीर जखमी झाले. उपचार सुरु असतांना दोन्ही चालकांचा मृत्यू झाला. पिंपळकोठा येथील लहू अभिमन्यू चव्हाण आणि राजेंद्र सुभाष बडगुजर हे मंगळवारी पहाटे पाच वाता फिरण्यासाठी गेले असता त्यांना अपघात झाल्याचे व त्यातील एका वाहनाने पेट घेतल्याचे दिसून येतच त्यांनी वाहनांवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून अपघाताची माहिती दिली तसेच एरंडोल पोलिसांना माहिती दिली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !