जळगावात ओव्हरहेड वायर्सला स्पर्श झाल्याने तरुणाचा मृत्यू


जळगाव : रेल्वेच्या ओव्हरहेड वायर्सला स्पर्श झाल्याने शहरातील खोटेनगरातील 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री ही घटना घडली. योगेश गुलाब मराठे (20) असे मयत तरूणाचे नाव आहे़ सोमवारी रात्री योगेश हा मित्रांसोबत घराबाहेर दुचाकीने फिरण्यासाठी आला असता रात्री आठ वाजेच्या सुमारास तिघेही पिंप्राळा रस्त्यावरील बजरंग बोगद्याजवळील रेल्वे रूळाजवळ लघुशंकेसाठी आल्यानंतर यावेळी इंधन वाहून नेणारी मालगाडी उभी असताना योगेश हा मालगाडीवर चढला असता रेल्वेच्या ओव्हरहेड वायर्सला त्याचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.


कॉपी करू नका.