निंभोरासीमला दरड कोसळुन दोन युवक ठार : एक जखमी

निंभोरासीमसह नायगावात शोककळा : एक जण सुदैवाने बचावला
रावेर : निंभोरासीमला दरड कोसळुन दोन युवक ठार ः एक जखमी तालुक्यातील निंभोरासीम गावाजवळ उंच दरड कोसळल्याने 20 वर्षीय दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, 7 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने निंभोरासीम व नायगाव गावात मोठी खळबळ उडाली आहे. दीपक सवर्णे (20, निंभोरासीम) व सुशांत मराठे (22, नायगाव) अशी मयतांची नावे असून या घटनेत समाधान कोळी (नायगाव) हे देखील जखमी झाले आहेत.


