Uddhav Thackeray जगातील सर्वात शक्तिमान हिंदू नेता देशाचा पंतप्रधान असताना हिंदूचा आक्रोश दुर्दैवी : उद्धव ठाकरे


Hindu outcry is unfortunate when the most powerful Hindu leader in the world is the Prime Minister of the country : Uddhav Thackeray छत्रपती संभाजीनगर : जगातला सर्वात शक्तिमान नेता हिंदू नेता या देशाचा पंतप्रधान झाल्यानंतरही हिंदूनां आक्रोष करावा लागतोय, त्या नेत्याची शक्ती काय कामाची, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरातील रविवारच्या सभेत लगावला. महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या राज्यामध्ये सावरकर गौरव यात्रा निघाली आहे. तत्पूर्वी हिंदू जनआक्रोष मोर्चे निघाले होते. तुमच्याकडेही मोर्चा निघाला होता ना. मुंबईत निघाला होता. कुठून निघाला होता, माहिती नाही. मात्र तो शिवसेना भवनासमोर आला होता. जगातला सर्वात शक्तिमान नेता, हिंदू नेता या देशाचा पंतप्रधान झाल्यानंतरही हिंदूनां आक्रोष करावा लागतोय, त्या नेत्याची शक्ती काय कामाची, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला.

मग तुम्ही काय चाटत आहात !
मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असेल तर तुम्ही मेबबुबा मुफ्तींसोबत काय करत होता. आम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटले तर मोदी-शहा शिंदे गटाचं काय चाटतंय? लालू-नितीश यांचं सरकार पाडून तुम्ही नितीश यांचं काय चाटलं? मेघालयातील सरकारवर आरोप केले आणि आता त्यांच्यासोबत सत्तेत बसलेत, अमित शहा तुम्ही आता संगमांचं काय चाटताय? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला. शिवरायांचे नाव घेता आणि पाठिमागून वार करता. पदव्या दाखवून तरुणांना नोकर्‍या मिळत नाही आणि पीएम मोदींची पदवी मागितली म्हणून 25 हजारांचा दंड होतोय, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.





तर मी घरी बसेन !
महाविकास आघाडी सरकारच्या काळात, हिंदू असो, मुस्लिम असो वा ख्रिश्चन असो, कुठल्याही धर्मीयांना आक्रोष करायची वेळ आली नव्हती. आता माझ्यावर आरोप करतात की, मी हिंदुत्व सोडलं. पण मी हिंदुत्व सोडल्याचं एक उदाहरण मला दाखवून द्या, मी हिंदुत्व सोडलंय हे सिद्ध झालं तर मी घरी बसेन. काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असेल तुम्ही मुफ्ती मोहम्मद सईद आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत बसलात, तेव्हा काय सोडलं, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विचारला.

शिंदे सरकारवरही चालवले टिकेचे बाण
उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरही बोचरी टीका केली. बाप चोरणारी टोळी म्हणत त्यांचा नोमोल्लेख केला. तर, शिंदे गटाचे मालेगावमधील आमदार सुहास कांदे यांचा नावाचा उल्लेख करत एक कांदा 50 खोक्यांना विकला गेल्याची टीका केली. यासह, चंद्रकांत पाटील यांच्याही नावाचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला. चंद्रकांत पाटील यांनी जाहीर सभेत म्हटलं होतं की, आम्ही काळजावर दगड ठेऊन मिंध्यांना मुख्यमंत्री बनवतोय, असे ठाकरेंनी म्हटलं. तसेच, उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरमधील अब्दुल सत्तार, संजय शिरसाट यांच्यावरही निशाणा साधला. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या विधानाचा उल्लेख करत, तर शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा उल्लेख करत नाव न घेता या दोन्ही नेत्यांवर टीका केली.

देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. माझे पक्ष चोरले, धनुष्यबाण चोरला, बापही चोरायला निघाले आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी करीत देश हुकूमशाहीकडे जात असल्याचा आरोप केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !