अवैधरीत्या मद्याची वाहतूक करतान शिरपूर पोलिसांची कारवाई : दहा हजारांचा मद्यसाठा जप्त
Action of Shirpur police while illegally transporting liquor: Liquor stock worth ten thousand seized शिरपूर : इंदौरकडून नरडाणाकडे निघालेल्या चारचाकी कार (क्र.एम.एच.03 / डी.जी.9051) मधून नऊ हजार सहाशे रुपये किंमतीचा विदेशी दारूचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
कार चालकाविरोधात गुन्हा
या प्रकरणी कार चालक सुभाष करचन पावरा (रा.अमरीश नगर, आंबा, ता.शिरपूर) याच्याविरोधात पोलिस कर्मचारी भट्ट राजेंद्र साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ललित पाटील करीत आहेत.