रावेर विकासोच्या व्हा.चेअरमनपदी तुषार मानकर


रावेर : रावेर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या व्हा.चेअरमनपदी तुषार मानकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या व्हा.चेअरमन डी.एन.महाजन यांनी राजीनामा दिल्याने रीक्त झालेल्या पदावर मंगळवारी प्रसिध्द छायाचित्रकार तुषार मानकर यांची सर्वानेमते निवड करण्यात आली. निवडीबद्दल चेअरमन ज्ञानेश्वर महाजन, सदस्य डी.एन.महाजन, विनोद तायडे, भागवत चौधरी, सुधाकर महाजन, रवींद्र महाजन, शकुंतलाबाई महाजन, छायाबाई महाजन, देविदास महाजन, कैलास वाणी, रामदास महाजन, मुरलीधर महाजन, संतोष पाटील आदींनी अभिनंदन केले.


कॉपी करू नका.