सीमा शस्त्र बलाच्या जवानांना मारहाण : भुसावळात आरोपींना अटक


भुसावळ : अप कर्मभूमी एक्स्प्रेसमध्ये सीमा शस्त्र बलाच्या जवानांना मारहाण करणार्‍या आठ आरोपींना भुसावळ रेल्वे स्थानकावर सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. या आरोपींचा नंतर वर्धा पोलिसांनी ताबा घेतला आहे. समजलेल्या माहितीनुसार टूरवर गेलेले काही कॉलेजचे विद्यार्थी व त्यांच्या सोबत असलेल्या परीवारातील सदस्यांशी बोगी क्रमांक बी- 2 मध्ये छेडखानीवरून प्रवाशांशी वाद झाला व नंतर त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. प्रवाशांनी सीमा शस्त्र बलाच्या जवानांना मारहाण केल्यानंतर त्यांनी नागपूर-वर्धा लोहमार्ग पोलिसांना सूचित केल्यानंतर भुसावळ लोहमार्ग पोलिसांना भुसावळ गाडी आल्यानंतर संबंधित संशयीत आरोपी असलेल्या प्रवाशांना ताब्यात घेण्याचे सूचित करण्यात आल्यानंतर लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांनी आठ संशयीत प्रवाशांना ताब्यात घेतल्यानंतर रात्री उशिरा वर्धा पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतले. जवानांच्या तक्रारीनुसार उभय प्रवाशांविरूद्ध बेकायदा जमाव जमा करून मारहाण केल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.


कॉपी करू नका.