भुसावळात शंकराचार्यांच्या दर्शनासाठी उसळली गर्दी


भुसावळ : करवीर पीठ कोल्हापूरचे शंकराचार्य यांचे मंगळवारी सकाळी शहरात आगमन झाल्यांनतर त्यांच्या स्वागतानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली.शोभायात्रेत 70 कलशधारी महिला भाविक अग्रभागी राहिल्या तर शंकराचार्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. प्रसंगी मंदीरात श्रीराम रेणूका मातेस कलश अभिषेक शंकराचार्य यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती. मंगळवारी सकाळी आठला राष्ट्रीय महामार्गापासून श्रीराम रेणूका देवीच्या मंदिरापर्यंत शंकराचार्यांची घोडा गाडीतून (बग्गी) मिरवणूक काढण्यात आली. शंकराचार्यांच्या हस्ते रेणुका माता मंदिरात शतचंडी यज्ञ मंडप व देवतांचे पूजन होऊन अभिषेक करण्यात आला. उपस्थित भाविकांना शंकराचार्य यांनी रामायणावर प्रबोधन केले. यात त्यांनी स्त्री शिक्षा, स्त्री धर्म, यज्ञ या विषयावर भाविकांना मार्गदर्शन केले. शंकराचार्य हे सोमवारीच शहरात दाखल झाले होते, ते देना नगरात राजेद्र नाईक यांच्याकडे मुक्कामी होते. महामार्गाने काढण्यात आलेल्या शोभा यात्रेत भाविकांची गर्दी होती.


कॉपी करू नका.