बभळाजनजीक चारचाकी पुलाखाली कोसळली ः 12 प्रवासी


जळगाव : जामनेर तालुक्यातील लोणी येथील प्रवासी घेऊन जाणारी चारचाकी बभळाज गावाजवळील नाल्याच्या पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात 12 प्रवासी जखमी झाले. यात एकाची प्रकृती गंभीर आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चारचाकी (एम.एच.15 सी.एम 3990) ही चालक आत्माराम विष्णू बोरसे (रा़ लोणी, फत्तेपूर) हा जामनेर येथील प्रवाश्यांना घेऊन मध्यप्रदेशातील पानसेमल येथे जात असताना बभळाज गावाच्या पुर्वेस आनंदा महाजन यांच्या शेताजवळील नाल्याच्या पुलाच्या जवळ वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेली क्रुझर थेट नाल्यात जावून कोसळल्याने 12 प्रवासी जखमी झाले. या अपघातात शिवाजी राजाराम खैरे, विशाखा श्रीकृष्ण सोनवणे, श्रावण सुकदेव ताठे, अमोल भारत बोरसे, रेणुका उत्तम बोरसे, गजानन रघुनाथ जाधव यांच्यासह अन्य प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात आले.


कॉपी करू नका.