अल्पवयीन बालिकेवर मामाकडून अत्याचार : आरोपीला 14 वर्ष शिक्षा

जळगाव : अल्पवयीन मुलीवर नात्याने सख्खा मामा असलेल्या आरोपीनीच अत्याचार केला होता. आरोपीला जळगाव न्यायालयाने 14 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. गणेश पोपट खवले (24, रा.म्हसला, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडीतेच्या वडीलांचे निधन झाल्यानंतर शेती कामात सहकार्य व्हावे यासाठी पीडीत मुलीच्या आईने आरोपीस त्यांच्या गावी भोरटेक, ता. भडगांव येथे बोलवले. त्यावेळेस पीडीत बालिका ही आठवीत शिकत होती. आरोपीने तुला व तुझ्या कुटूबियांना मारुन टाकेल, अशी धमकी देवून पीडीतेचे शोषण करीत अत्याचार केले तर पीडीतेच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या वैद्यकीय तपासणीत ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले होते. पीडीतेला आई व काका, काकू यांनी विश्वासात घेवून विचारणा केला असता पीडीतेने आरोपीचे नाव व हकीकत सांगितली होती. त्यावेळी पीडीतेच्या आईने भडगांव पोलीस स्टेशनला दिलेल्या तकारीवरुन आरोपीविरुध्द गुन्हा दाखल होता. या गुह्यिात तपास अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक रवींद्र जाधव यांनी गुन्ह्याचा तपास काम करून भडगांव न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे सहा.सरकारी वकील प्रदीप एम.महाजन यांनी काम पाहिले.


