बांग्लादेशात पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका
Elections on ballot paper again in Bangladesh मुंबई : भारतात 2019 पासून निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी काही राजकीय पक्षांकडून करण्यात येत असतानाच शेजारच्याच बांग्लादेशात विरोधकांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे. बांग्लादेश निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2024 मध्ये होणार्या आगामी 12व्या संसदीय निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरली जाणार नाहीत. बीएनपीसह प्रमुख विरोधी राजकीय पक्षांनी ईव्हीएमच्या वापरास जोरदार विरोध केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
भारतात बॅलेट पेपरला विरोधच
भारतात निवडणूक आयोगाने यापुढे मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर होणार नाही, असे स्पष्ट सांगितले होत. तसेच त्यावेळचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परीषदेत आता ईव्हीएमवरच निवडणूक घेण्यात येईल, असे स्पष्ट केले होते तर दुसरीकडे आता बांग्लादेशात पुन्हा एकादा बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जाणार आहेत. बांग्लादेशच्या शेख हसीना यांच्या सरकारने यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएमचा वापर न करण्याचे ठरवले आहे. शेख हसीना यांच्या सरकारने ईव्हीएम काढून टाकण्याची आणि बॅलेट पेपरद्वारे देशात लोकसभा निवडणूक घेण्याची विरोधकांची मागणी मान्य केली आहे.


ईव्हीएम रद्दचे कारण दिलेच नाही
बांग्लादेशात वर्षाच्या शेवटी निवडणूक प्रचाराला सुरुवात होणार असून पुढील वर्षी जानेवारीत मतदान होणार आहे. बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने ईव्हीएम रद्द करण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही. मात्र, बांगलादेशात सर्वच मतदारसंघात ईव्हीएमचा वापर केला जाणार नाही. बांग्लादेशातील प्रमुख विरोधी पक्ष बीएनपीसह प्रमुख विरोधी राजकीय पक्षांनी निवडणुकीत ईव्हीएमच्या वापराला कडाडून विरोध केला होता. त्यामुळे बांगलादेशातील सर्व 300 संसदीय मतदारसंघात मतपत्रिका आणि मतपेट्या वापरल्या जाणार आहेत. बांगलादेश निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे. दुसरीकडे बांगलादेशातील राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे की, जुन्या कागदी मतपत्रिका परत आणल्याने लोकशाही मूल्ये बळकट होणार आहेत.निवडणूक घेण्याची विरोधकांची मागणी मान्य केली आहे.


