भुसावळात लोखंडी सुरा बाळगणार्या कृष्णा शुटरला अटक

Krishna Shooter, who was carrying an iron knife, was arrested in Bhusawal भुसावळ : शहरातील म्युन्सीपल कॉलनीतील संशयीताकडून बाजारपेठ पोलिसांनी सुरा जप्त करीत संशयीताला अटक केली आहे.
बाजारपेठ पोलिसात गुन्हा
कॉन्स्टेबल जीवन भास्कर कापडे यांच्या तक्रारीनुसार, संशयित कृष्णा उर्फ शुटर मिलिंद गायकवाड (19, म्युन्सीपल कॉलनी, भुसावळ) याच्याकडे सुरा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी रात्री 10.10 वाजता धाव घेत कारवाई करीत 300 रुपये किंमतीचा व 11 इंच लांबीचा लोखंडी सुरा जप्त केला. तपास हवालदार विजय नेरकर करीत आहेत.