भुसावळच्या माजी नगराध्यक्षांना 50 हजारात गंडवले


भुसावळ : शहराचे माजी नगराध्यक्ष गोकुळ हुंडामल कार्डा यांना पे टीईएम सुरू करण्याच्या बहाण्याने 50 हजारात भामट्यात गंडवल्याची घटना मंगळवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी त्यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे. झाले असे की, कार्डा यांना मोबाईलमध्ये पे टीईएम इन्स्टॉल करावयाचे असल्याने त्यांनी अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर 8250056179 या क्रमांकावरून कॉल आल्यानंतर संंबंधिताने आपले नाव राजेंद्र प्रसाद असल्याचे सांगत अ‍ॅनी डेस्क इन्स्टॉल करण्यास सांगून डेबिट कार्ड डिटेल्स व सीव्हीसी क्रमांक टाकण्यास सांगितला व काही वेळातच कार्डा यांच्या खात्यातून 49 हजार 900 रुपये विड्रॉल करण्यात आले. कार्डा यांनी संबंधीत क्रमांकावर संपर्क साधला असता दोन तासात पैसे पुन्हा परत येतील, असे उभय इसमाने सांगत फोन कट केला मात्र पैसे परत न आल्याने कार्डा यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बुधवारी दुपारी बाजारपेठ पोलिसात धाव घेतली.


कॉपी करू नका.