तरुण-तरुणींना चाकूच्या धाकावर धमकावून लूट : धुळ्यातील दोघांना अटक
Loot by threatening young men and women at knifepoint : Two arrested in Dhule धुळे : शहराजवळील मोराणे गावापासून गोंदूर गावाकडे जाणार्या बायपास रस्त्यावर महाविद्यालयीन तरुण-तरुणी एकांतात भेटल्यानंतर दोघांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून 12 हजार रुपये किंमतीचे मोबाईल लुटले होते. 4 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडल्यानंतर चारुदत्त अनिल जोशी या विद्यार्थ्याने देवपूर पश्चिम पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक कौशल्याद्वारे आरोपी जाळ्यात
संशयितांचे वर्णन आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करीत पोलिसांनी आनंदखेडे येथून देवेंद्र एकनाथ भील (20) आणि आर्वी येथून अजय रुपा सोनवणे (24) या दोन संशयितांना अटक केली. दोघांनीही गुन्ह्याची कबुली देत लूट केलेले मोबाईल काढून दिले असून गुन्ह्यातील चाकूसह दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक एम.एच सय्यद, प्रवीण अमृतकर, किरण जगताप, पुरुषोत्तम सोनवणे, धर्मेंद्र मोहिते, सुनील राठोड, निलेश हलोरे, रवींद्र हिरे आदींच्या पथकाने केली.