पाचोरा तालुक्यात शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू


A farm laborer died of heat stroke in Pachora taluk पाचोरा : पाचोरा तालुक्यात शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पाचोरा तालुक्यातील वरसाडे येथील रहिवासी शेतमजूर प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण (36) हे सोमवार, 10 एप्रिल रोजी दुपारी शेतात काम करत त्यांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात तापमानाचा पारा 43 अंशावर पोहोचल्यानंतर अंगाची लाही-लाही होत असताना आता शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू ओढवल्याने खळबळ उडाली आहे.

शेतात चक्कर येवून पडताच मृत्यू
वरसाडे तांडा येथील भूमीहीन शेतमजूर प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण हा आई, वडील, मोठा भाऊ, पत्नी, एक मुलगी व दोन मुलांसह एकत्रित कुटुंबात वास्तव्याला होता. स्वतःची शेतजमीन नसल्याने मिळेल ते काम करून तो कुटूंबाचा गाढा हाकत होता. प्रेमसिंग हा शेतमजूरी तर कधी जे.सी.बी.चालवण्यासाठी जात होता. सोमवार, 10 एप्रिल 2023 रोजी प्रेमसिंग नियमितपणे शेतात काम करण्यासाठी गेला असता दुपारच्या सुमारास उन्हामुळे अचानकपणे चक्कर येऊन बेशुद्ध होऊन खाली पडला. प्रेमसिंग अचानक जमिनीवर पडल्याचे पाहून सोबतच्या मजूरांनी त्याला उचलून नेत सावलीत नेत शुध्दीवर आणण्यासाठी तोंडावर पाणी मारले मात्र प्रेमसिंग हालचाल करीत नसल्याने त्याच अवस्थेत पिंपळगाव हरेश्वर येथील डॉ. नितीन चव्हाण यांच्या दवाखान्यात आणण्यात आले असता डॉ.चव्हाण यांनी प्रेमसिंग चव्हाण यांची तपासणी करुन मृत घोषित केले. शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे वरसाडे तांड्यावर शोककळा पसरली. शासनाने या कुटुंबाला मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !