शिरपूरात पिस्टलाच्या धाकावर दहशत : पिस्टल, जिवंत काडतूसांसह दोघे जाळ्यात
In Shirpur, panic over the pistol : Two in the net with pistol, live cartridges शिरपूर : गावठी पिस्टलाच्या धाकावर दहशत निर्माण करणार्या दोन युवकांना शिरपूर शहर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. अरबाज इस्माइल शेख (21) व शाबीर शहा सगीर शहा (19) अशी संशयितांची नावे असून त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. संशयीताना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
गोपनीय माहितीवरून आरोपी जाह्यात
शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ए.एस.आगरकर यांना अंबिका नगरातील दोन संशयीतांकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला मंगळवारी कारवाईचे आदेश दिल्यानंतर दोघा तरुणांना अटक करण्यात आली. तरुणांच्या ताब्यात पिस्टल, दोन जिवंत काडतूस मोटारसायकल, मोबाईल असा एकूण 87 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचसह उपनिरीक्षक किरण बार्हे आदींनी ही कारवाई केली.