जळगावात बालिकेची हत्या : आरोपी पित्याला पारोळ्यातून अटक

घरगुती वादातून टोकाचे पाऊल : आत्महत्येपूर्वीच आरोपीच्या आवळल्या मुसक्या
जळगाव : घरगुती वादातूनच बापानेच सात वर्षीय मुलीचा गळा आवळून खून करीत पळ काढला व मित्राला आपणही पारोळ्यात आत्महत्या करीत असल्याची माहिती दिली मात्र सतर्क पारोळा पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, अटकेतील आरोपी बापाने बांभूरी पुलावरून मुलीला फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे. कोमल संदीप चौधरी (7) असे मयत बालिकेचे नाव आहे.
आधी बाप-लेक होते बेपत्ता
बुधवारी रात्रीपासून कोमल चौधरी व तिचे वडील संदीप यादव चौधरी हे बेपत्ता होते व याबाबत जळगाव तालुका पोलिसात हरवल्याची नोंदही करण्यात आली तर गुरूवारी सकाळी गिरणा नदीच्या पुलाजवळ कोमलचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. आरोपीने मुलीचा खून केला असल्याची माहिती मित्राला देत आपणही पारोळ्यातील आयटीआयमागे आत्महत्या करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार पारोळा पोलिसांना सूचि तकरण्यात आले. पारोळा पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या कॉन्स्टेबल पंकज राठोड व सुनील साळुंखे यांनी आयटीआय परीसरात संदीप चौधरी याचा त्याचे नातेवाईक दिनेश चौधरी यांच्या मदतीने शोध घेतला असता सदर आरोपी हा आयटीआय जवळील मैदानात आढळल्याने त्यास अटक करण्यात आली.
गळा आवळून मुलीची हत्या
आरोपीने मुलगी कोमल संजय चौधरी हिला 8 रोजी खोटे नगरातील घरातून रीक्षाने बांभोरी येथे आणले व गिरणा नदी जवळील नर्सरीजवळ आणुन तिचा हाताने गळा आवळून तिला जिवे ठार मारले व त्यानंतर पहाटे साडेचार वाजता तो धुळे बसला पारोळ्यात आला व त्याने मित्रास फोन करून मुलीला ठार मारण्याची कबुली देत पारोळ्यात आपणही हत्या करणार असल्याचे सांगितल्याची माहिती आहे.


