अवैध वाळू वाहतूक : पथकाने पकडले ट्रॅक्टर

रावेर : रात्रीच्या सुमारास भिंगी रेतीची अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाने पकडल्याने खळबळ उडाली आहे. मंडळाधिकारी प्रदीप आळे यांच्या माहितीनुसार बुधवारी रात्रीच्या सुमारास भिंगी रेती घेऊन ट्रॅक्टर (एम.पी.12-1952) रावेर शहरातून जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी सचिन पाटील, तलाठी दादासाहेब कांबळे, यासीन तडवी, शैलेश झोलटे यांच्या पथकाने कारवाई केली.


