दुचाकी चोरटा दोंडाईचा पोलिसांच्या जाळ्यात
Two-wheeler thief in police net दोंडाईचा : दुचाकी चोरट्याच्या दोंडाईचा पोलिसांनी मुसक्या आवळत दुचाकी जप्त केली आहे. विजय नारायण भील (चिलाणे, ता.शिंदखेडा) असे अटकेतील संशयीतांचे नाव असून त्याच्याकडून चोरीतील दुचाकी जप्त करण्यात आली. कन्हैयालाल लोटन भील (कोकराळे) यांची 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.18 पी.3815) ही 10 एप्रिल रोजी बसस्थानकासमोरल हॉटेल जवळून चोरीला गेली होती. संशयीत कन्हैय्यालाल याने ती चोरल्याचे कळताच त्यास अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी ए.एस.आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल संदीप कदम, अनारसिंग पवार, प्रवीण निंबाळे, प्रेमराज पाटील, अनिल धनगर यांच्या पथकाने केली.