Notorious mafia Atiq Ahmed finally buried in the soil ! कुविख्यात माफिया अतीक अहमद अखेर मातीत दफन !


Notorious mafia Atiq Ahmed finally buried in the soil! प्रयागराज : माफिया अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्यावर रविवारी रात्री दफनविधी करण्यात आला. कब्रस्थानबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. एकेकाळी स्वतःच्या दहशतीने प्रयागराजमध्ये दशहत निर्माण करणार्‍या माफिया अतीक अहमद याला तेथल्याच मातीत दफन करण्यात आले. दरम्यान, हल्लेखोरांनी अतीकवर आठ तर अशरफवर पाच गोळ्या झाडल्याची बाब शवविच्छेदनातून समोर आली आहे.

दहशत निर्माण करणार्‍या मातीतच केला दफन
अतीक आणि अशरफचे रविवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. डॉक्टरांनी अतीकच्या शरीरातून एकूण आठ गोळ्या काढल्या. त्यापैकी 1 डोक्यात, 1 मानेत, 1 छातीत आणि 1 कमरेत घुसली आहे. दुसरीकडे, अशफला 5 गोळ्या लागल्या आहेत. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रविवारी रात्री 8.30 वाजता त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला.





हल्लेखोरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
न्यायालयाने अतीक-अशरफ यांच्या तिन्ही हल्लेखोरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. घटनेच्या वेळी पोलिसांनी तिघांनाही घटनास्थळावरून पकडले होते. तिघांचीही कोठडीत चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला असून हे हत्याकांड घडवण्याचे कारणही सांगितले. पोलिसांनी या तिघांची कुंडली तपासली असता, ते हिस्ट्रीशीटर असल्याचे समोर आले. त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.

कासारी-मासारीत दफनविधी
प्रयागराजमधील कासारी मसारी स्मशानभूमीत अतिक आणि अशरफ यांच्यासाठी कबर खोदण्यात आल्यानंतर रविवारी रात्री दोघांवर दफनविधी करण्यात आला. यापूर्वी शनिवारी अतिक अहमदचा मुलगा असद यालाही याच स्मशानभूमीत दफन करण्यात आले. शनिवारी सकाळीच असदचा मृतदेह झाशीहून प्रयागराजला आणण्यात आला होता. झाशीच्या बारागाव पोलीस स्टेशन परीरसरात गुरुवारी यूपी एसटीएफने त्याला चकमकीत ठार केले होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !