पेढ्यातून गुंगीचे औषध देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार : साक्री तालुक्यातील घटना
Abuse of a minor girl by giving gungi medicine from herd : incident in Sakri taluka साक्री : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन तरुणीला पेढ्यातून गुंगीचे औषध दिल्यानंतर निर्जनस्थळी अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी तिघांविरोधात पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पेढ्यातून दिले गुंगीचे औषध
साक्री तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन तरुणीला गावातील परीचयाच्या तरुणाने पेढा दिल्यानंतर तिला गुंगी आली व त्यानंतर तरुणीचे अपहरण करून तिच्यावर वाहनात अत्याचार करण्यात आल्याचा आरोप तरुणीने केला आहे. पीडीतेच्या तक्रारीनुसार, 11 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ती स्वयंपाक करीत असताना संशयित दादू गुलाब कारंडे (22) याने पेढा दिला व ता खाताच तिची शुद्ध हरवली व जाग आल्यानंतर ती एका गाडीत असल्याचे आढळले. संशयिताला विचारणा केल्यानंतरही त्याने वाहनातच बलात्कार केला. यावेळी एक जण गाडी चालवत होता तर दुसरा मुलगाही वाहनातच होता. यानंतर एक शेडमध्येही दादूने तरुणीला नेले मात्र तेथे दादूच्या काकाने तिची सुटका केली. तपास पोलीस उपनिरीक्षक आर.व्ही.निकम करत आहेत.