भुसावळात पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे दुर्गेश ठाकूर विजयी


भाजपा-सेना उमेदवाराचा पराभव : अवघ्या 20 मिनिटात हाती आला निकाल

भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 24 अ मधील एका जागेसाठी गुरुवार, 9 रोजी निवडणूक झाली होती तर अवघे 41.13 टक्के मतदान झाल्याने कोण विजयी होणार? याकडे लक्ष लागले होते. शुक्रवार, 10 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास प्रांत कार्यालयात मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर अवघ्या 20 मिनिटात निकाल लागला. राष्ट्रवादीचे दुर्गेश ठाकूर या प्रभागातून विजयी झाले असून त्यांनी दोन हजार 291 मते घेत भाजपाच्या रेखा सुनील सोनवणे यांचा 862 मतांनी पराभव केला. सोनवणे यांना एक हजार 429 मते मिळाली तर सेना उमेदवार विक्की चव्हाण यांना अवघी 90 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे तर सहाय्यक निवडणूक अधिकारी करुणा डहाळे यांनी काम पाहिले.


कॉपी करू नका.