नवापूरात माजी नगरसेवकाच्या गोदामातून 89 लाखाची देशी-विदेशी दारू जप्त
नाशिक आयजींच्या पथकासह स्थानिक पोलिसांची कारवाई : 15 संशयीतांना अटक
Domestic and foreign liquor worth 89 lakhs seized from former corporator’s godown in Nawapur नवापूर : नाशिक आयजींच्या विशेष पथकासह स्थानिक पोलिसांनी माजी नगरसेवक विश्वास भीमराव गढरी यांच्या गोदामातून तब्बल 89 लाख दोन हजार 495 रुपयांची देशी-विदेशी दारूसह दोन लाख 78 हजार 309 रुपयांची रोकड व चारचाकी-दुचाकी वाहने जप्त केली आहेत. या प्रकरणी 15 संशयीतांना अटक करण्यात आली. ही कारवाई शहरातील गणेश हिल परीसरात रविवार, 16 एप्रिल रोजी रात्री करण्यात आली. विशेष म्हणजे दारूच्या तस्करीसाठी आलिशान वाहनांचा वापर केला जात होता. पथकाने 17 चारचाकी, नऊ दुचाकी जप्त केल्या असून 15 चारचाकी वाहनांचे सीट काढून त्याद्वारे मद्य तस्करी होत असल्याची माहिती समोर आली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
नवापूर पोलीस ठाणे हद्दीत गणेश हिल परीसरात विश्वास भीमराव गढरी हा त्याच्या हस्तकांमार्फत त्याचे गोदामात अवैधरीत्या विदेशी दारू व बिअरचा साठा करून गुजरात राज्यात दारू विक्रीवर बंदी असतांना देखील वाढीव दराने विकत असल्याची माहिती नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांना मिळाली होती. विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकातील पोलीस निरीक्षक बापू रोहम, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिलावट, बशीर तडवी, हवालदार शकील शेख, पोलिस नाईक प्रमोद मंडलीक, मनोज दुसाणे, नारायण लोहरे, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक युवराजसिंग परदेशी, पोलीस परमानंद काळे, रणजीत महाले यांच्या पथकाने गणेश हिल परीसरात छापामारी केल्याने खळबळ उडाली.
15 संशयीतांना केली अटक
या प्रकरणी कौशिक सुरेशभाई पटेल (36, उदवाडा, कलसर, ता.पारडी, वलसाड, गुजरात), पंकजभाई ईश्वरभाई पटेल (31, सरसीया बस्ता फलिया, खेरगाम, जि.नवसारी, गुजरात), शाम अचल माजी (28, रीया, थाना चेवथर, जि.रीवा, मध्यप्रदेश), अंगतसिंह दिनेशसिंह भदौरीया (24, बिजपुरी पोलावन, भिड, मध्यप्रदेश), प्रतीक सुमनभाई पटेल (23, सरोडी, ता.बलसाड, गुजरात), अखिलेश शिवदान सिंह भदोरीया (21, बिजपुरी पोलावन, भिंड, मध्यप्रदेश), अनिलसिंह सुरेंद्रसिंह भदौरीया (29, बिजपुरी, पो.लावन, भिंड, मध्यप्रदेश), सामंतसिंह शिवपालसिंह भदौरीया (20, बिजपुरी पोलावन, भिंड, मध्यप्रदेश), सुरजकुमार हाकिम सिंह (20, जारखी, गाव गढी निर्भय, कुंडला, फिरोजाबाद, उत्तरप्रदेश), जितेंद्रसिंह समशेरसिंह भदौरीया (21, बिजपुरी, लायन, भिंड, मध्यप्रदेश), प्रदीपसिंह सिंग भदोरिया (27, बिजपुरी पो.लावन, भिड, मध्यप्रदेश), कृष्णकुमारसिंह शिवदानसिंह भदौरीया (22, बिजपुरी पोलावन, जि.भिंड राज्य मध्यप्रदेश), शार्मासिंह रामप्रसाद सिंह भदौरीया (40, ग्राम बिजपुरी, लावन, जि.भिंड, मध्यप्रदेश), शिवप्रताप तिलकसिंह भदोरीया (52, बिजपुरी पो. लावन, जि.भिंड, मध्यप्रदेश), अजित पवार लोखंडे (34, निपाणे, ता.पाचोरा), तौसीफ उर्फ आकाश रा.नवापूर, जि.नंदुरबार) व दोन अल्पवयीन मिळून 19 संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील 15 संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे.