मेणबत्ती बनवताना दारूच्या स्फोटानंतर भीषण आग : जैताणेतील चार महिला ठार
मृतांमध्ये तीन महिलांसह अल्पवयीन तरुणीचा समावेश : सुरक्षेचे नियम पायदळी
Explosion in candle making factory near Chiplipada four laborers died on the spot धुळे : सुरक्षेचे नियम पायदळी तुडवत साक्री तालुक्यात सुरू असलेल्या मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्यात स्फोटक दारूमुळे कारखान्यात स्फोटानंतर भीषण आग लागल्याने त्यात जैताणे गावातील सहा महिला मजूर होरपळल्यानंतर त्यातील तिघा महिलांसह एका अल्पवयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाल्या. या धक्कादायक घटनेत दोन महिलाही गंभीर झाल्या आहेत. अधिकार्यांसह पोलीस प्रशासनाने धाव घेत कारखाना मालकास अटक केली आहे.
चौघा महिलांचा होरपळून मृत्यू
निजामपूर जवळील चिखलीपाडा गावाजवळील कारखान्यात घडलेल्या आगीत आशाबाई भैय्या भागवत (34), पूनम भैय्या भागवत (16), सिंधुबाई धुडकू राजपूत (55), नयनाबाई संजय माळी (48) यांचा जागीच मृत्यू झाला तर निकिता सुरेश महाजन व संगीता प्रमोद चव्हाण या गंभीर जखमी झाल्याचे सांंगण्यात आले. जखमींना नंदुरबार येथे उपचारार्थ हलवण्यात आले आहे. कारखान्यातील स्फोट प्रकरणी कारखाना मालक जगन्नाथ रघुनाथ कुंवर (वासखेडी) यास निजामपूर पोलिसांनी अटक केली.