दैवी शक्तीचा सुलेमानी पत्थरच्या नावाने आंध्रतील भंगार व्यावसायीकाला लालगोट्यात मारहाण करून लुटले
टोळ्या पुन्हा सक्रिय ; लालगोट्यातील प्रकार : संशयितांविरोधात गुन्हा
In the name of Sulaimani Patthar, a scrap dealer in Andhra was beaten and robbed in the name of divine power.\ मुक्ताईनगर : दैवी शक्ती असलेला सुलेमानी पत्थर विकत देण्याच्या बहाण्याने आंध्र प्रदेशातील भंगार व्यावसायिकाला मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा येथे बोलावल्यानंतर संशयीतांनी मारहाण करीत लुटल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी दिड वाजता घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात सात संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाण करीत लूट
भंगार व्यापारी शेख युनूस शेख कादर बादशहा (48, श्रीनिवासन, पुरुम तिरुपती, जि.चित्तुर राज्य आंध्रप्रदेश) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयितांशी परीचय झाल्यानंतर त्यांना लालगोटा येथे बोलावण्यात आले व ठरल्यानंतर शेख हे सोमवारी दुपारी लालगोटा येथे पोहोचल्यानंतर एका घरात नेल्यानंतर सात संशयितांनी एकत्र येत मारहाण सुरू केली. यावेळी संशयीतांनी त्यांच्याकडील 62 हजारांची रोकड व एक लाख रुपये किंमतीच्या चार सोन्याच्या अंगठ्या हिसकावून घेतल्या.




या संशयितांविरोधात गुन्हा
या प्रकरणी अक्काबाई जोगींदर भोसले, शिवदत्त जोगींदर भोसले, दयाल जोगींदर भोसले, जोगींदर राजवंती भोसले, शिवकिसन जोगींदर भोसले, रीतु मंटुस पवार, कृष्णा भोसले पुर्ण नाव माहीत नाही (सर्व रा. लालगोटा ता. मुक्ताईनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक संदीप दुनगहु करीत आहेत. दरम्यान, लालगोटा येथे यापूर्वी फसवणुकीच्या घटना घडल्या असून पुन्हा टोळी सक्रिय झाल्याने टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.