सारंगखेडा पुलावरून उडी घेत महिलेची आत्महत्या : तिघांविरोधात गुन्हा
नंदुरबार : शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील तिघांविरोधात महिलेच्या आत्म्हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आशाबाई नागो मोरे (45, साक्री रोड, धुळे) यांनी 13 एप्रिल रोजी डोंगरगाव, ता. शहादा येथे नात लक्षिका हिला भेटण्यासाठी आल्या असता त्यांना भेटू देण्यात आले नव्हते. यातून त्यांना संबंधितांकडून शिवीगाळ करण्यात आली होती. यातून मनस्ताप झाल्याने आशाबाई मोरे या थेट सारंगखेडा येथील तापी नदी पुलावरून उडी घेत आत्महत्या केली होती. ावेळी त्यांनी सुसाईड नोट लिहून दिली होती. यातून जगन्नाथ कृष्णा शिंदे (60), पंकज जगन्नाथ शिंदे (35) व मंजुषा रोशन मोरे (32) या तिघांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हटल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
भूषण नागो मोरे (साक्री रोड) यांनी सोमवारी सायंकाळी सारंगखेडा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित जगन्नाथ शिंदे, पंकज शिंदे व मंजुषा मोरे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान कोळी करत आहेत.