शिरपूर पोलिसांच्या सतर्कतेने टळला करवंद गावात बालविवाह


Shirpur police vigilance prevented child marriage in Karvand village शिरपूर : तालुक्यातील करवंद गावात मंगळवारी होत असलेला बालविवाह विवाहाच्या काही तासाअगोदर शिरपूर शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी नवरदेव नवरीच्या आई-वडिलांना समज देत समुपदेशन करून बालविवाह रोखला. झाले असे की, शिंदखेडा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह शिरपुर तालुक्यातील करवंद येथील मुलाशी मंगळवार, 18 एप्रिल 2023 रोजी दुपारी करवंद येथे नियोजित वेळेत होणार होता मात्र नियोजित विवाहातील नववधू ही अल्पवयीन असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी हवालदार अनिल जाधव, पंकज पाटील, विवेक जाधव, महिला पोलीस पूजा सारसर आदींनी घटनास्थळी पाठवले. यावेळी चौकशीत वधू अल्पवयीन असल्याचे निदर्शनात येताच नातेवाईकांना समज देण्यात आली.

हमीपत्र लिहल्यानंतर सुटका
वधू व वरास शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी बालविवाह विषयक कायदे, आरोग्य आणि बालविवाहाचे दुष्पपरीणाम आदींबाबत माहिती देत समुपदेशन करण्यात आले व वधू व वर आणि त्यांच्या आई-वडिलांनी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर विवाह करण्याचे लेखीपत्र लिहून दिल्यानंतर नियोजित विवाह थांबवण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !