फैजपूरात निवडीनंतर सभापतींचा सत्कार


फैजपूर : फैजपूर पालिकेच्या स्थायी समिती व पाच विषय समित्यांच्या सभापती बिनविरोध निवड करण्यात आली व स्थायी समिती गठीत करण्यात आली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे होते. फैजपूर पालिकेच्या विषय समित्यांच्या सभापती निवड करण्यासाठी गुरुवार 9 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता विशेष सभा बोलाविण्यात आली. तहसीलदार अरुण शेवाळे अध्यक्षस्थानी होते. स्थायी समितीच्या पदसिद्ध अध्यक्षपदी नगराध्यक्षा महानंदा होले तर निवड करण्यात आलेल्या पाच विषय समिती सभापती स्थायी समिती सदस्य असणार आहे

विषय समिती सभापती असे- पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती-सभापती पदसिध्द उपनगराध्यक्ष रशीद नसीर तडवी, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती- हेमराज चौधरी, स्वच्छता विषयक वैद्यकीय सार्वजनिक आरोग्य समिती सभापती- नफिसाबी शेख इरफान, महिला व बालकल्याण समिती सभापती- वत्सला रघुनाथ कुंभार, नियोजन व विकास समिती सभापती- शकुंतला भारंबे, महिला व बालकल्याण समिती सभापती- वत्सला रघुनाथ कुंभार. व्यासपीठावर नगराध्यक्षा सौ महानंदा होले, मुख्याधिकारी किशोर चव्हाण उपस्थित होते. सभेला भाजपा गटनेता मिलिंद वाघूळदे, काँग्रेस गटनेता कलीम खां मण्यार यांच्यासह 15 नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या. विषय समिती सभापती निवडीचे कामकाज पीठासीन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सभा लिपिक सुधीर चौधरी, वरीष्ठ लिपिक दिलीप वाघमारे, लिपिक संतोष वाणी यांनी काम पाहिले.


कॉपी करू नका.