माल वाहतूक करणार्या टेम्पोच्या धडकेने पारोळा तालुक्यातील दोघे भाऊ ठार
Two brothers from Parola taluka were killed when a tempo carrying goods collided with it
धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरील हॅाटेल यश प्रेसिडेंटनजीक सोमवारी रात्री 11 वाजता माल वाहतूक करणार्या टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दळवेल, ता.पारोळा येथे दोघा भावांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मंगळवारी सायंकाळी चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनला टेम्पो चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या अपघातात नामदेव मोरसिंग जाधव (35) व सुकदेव मोरसिंग जाधव (32, दोन्ही रा.दळवेल, ता.पारोळा) यांचा मृत्यू ओढवला.
टेम्पो चालकाविरोधात गुन्हा
नामदेव व सुकदेव जाधव हे दोघे भाऊ दुचाकीने (क्र.एम.एच. 15-एए 2228) जात असताना मागून येणार्या टेम्पोने (क्र.एम.एच.06-बीजी 4157) जोरदार धडक दिल्याने दोघेही जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अपघात झाल्यानंतरच चालक वाहन सोडून पसार झाला. याप्रकरणी स्वप्नील श्रावण जाधव (रा. दळवेल) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव रोड पोलिसात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप ठाकरे करीत आहेत.