यावलला लांडग्याचा बालकावर हल्ला : तावडीतून बालकास सोडवतांना तरुण गंभीर जखमी


Yawal wolf attack on a child : Youth seriously injured while rescuing the child from its clutches यावल : शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरामागील झोपडपट्टीत आईच्या कडेवरील दिड वर्षाच्या बालकावर लांडगा सदृष्य हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्यानंतर बालकास सोडवण्याच्या प्रयत्नात तरुण जखमी झाला. हिंस्त्र प्राण्यास ठार करण्यात आले असून बालकासह तरुणावर यावलला प्रथमोपचार केल्यानंतर जळगाव हलवण्यात आले.

तरुणाची प्रकृती गंभीर
यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराच्या पाठीमागे स्मशानभुमीच्या रस्त्यावर आदिवासी झोपडपट्टी आहे. येथे गोलु मनोज भिल हा दिड वर्षीय बालक आपल्या आईच्या जवळ असताना अचानक तेथे लांडगा सदृष्य हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला. महिलेजवळील बालकास पळवले असता योगेश अनिल भील (20) या तरुणाने लांडग्याचा पाठलाग करीत बालकाची सुटका केली मात्र हिंस्त्र प्राण्याने तरुणावर हल्ला केल्याने त्यात तरुण गंभीर जखमी झाला. स्वतःचे प्राण वाचवताना हिंस्त्र प्राण्यास ठार मारण्यात आले. जखमी अवस्थेत तरुणास यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर प्रथमोपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने तरुणाला जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात हलवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने या भागात येऊन पाहणी केली. दरम्यान, मृत प्राणी हा वन्यप्राणी असून त्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या भागातील नागरीकांनी केली आहे.














मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !