बोदवडला गळफास लावून एकाची आत्महत्या

बोदवड : शहरातील 37 वर्षीय इसमाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची दुदैवी घटना गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजेच्या घडली. गोपाल देवराम पाटील (37 रा.साकला कॉलनी, पोस्ट गल्ली, बोदवड) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी यांच्या पत्नी उज्वला गोपाल पाटील 28) यांच्या खबरीवरून बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास उज्वला पाटील या अमर डेअरी येथे दुध आणण्यासाठी गेल्या असता दुध घेऊन घरी आल्यावर घराचा दरवाजा आतून बंद असल्याने वारंवार आवाज देवूनही दरवाजा न उघडल्याने शेजारच्यांनी ही गोष्ट सांगितल्यानंतर त्यांनी किचनचा दरवाजा तोडून आत पाहिले असता गोपाल पाटील यांनी किचनमधील घराच्या छताच्या हुकाला नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. तत्काळ बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी गोपाल यांना मृत घोषित केले. मयत गोपाल पाटील यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले,असा परीवार आहे. त्यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण अद्याप कळू शकले नाही. तपास हवालदार कालिचरण बिर्हाडे करीत आहेत.


