97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरात होणार

सुमारे 70 वर्षांनंतर मातृहृदयी साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत भरणार सारस्वतांचा मेळा


The 97th All India Marathi Literary Conference will be held at Amalner अमळनेर : सुमारे 70 वर्षांनंतर आगामी 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर शहरात घेण्याचा निर्णय रविवारी झाला. हे संमेलन ऐतिहासिक करण्याचा संकल्प सारस्वतांसह अमळनेरवासीयांनी केला आहे. मातृ हृदयी साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत सारस्वतांचा मेळा भरणार असल्याने शहरवासीयांमध्ये अपूर्व उत्साह आहे.

चार स्थलांमधून अमळनेरची निवड
महामंडळाच्या रविवारी पुण्यात झालेल्या बैठकीत निमंत्रण आलेल्या चार स्थळांमधून अमळनेर या स्थळाची निवड करण्यात आली. त्यामुळे आता सुमारे 70 वर्षांनंतर साने गुरुजींच्या या कर्मभूमीत सारस्वतांचा मेळा भरणार आहे. वर्धा येथील 96 वे संमेलन संपून अवघे दोन महिने झाले असताना आगामी संमेलनाचे स्थळही निश्चित झाले आहे. यामुळे अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.





अमळनेरला दिली पसंती
97 व्या संमेलनासाठी महामंडळाला चार निमंत्रणे प्राप्त झाली होती. यामध्ये सातारा, औदुंबर, अमळनेर आणि जालना या चार स्थळांचा समावेश होता. संमेलनाच्या स्थळ निवड समितीने औदुंबर आणि अमळनेर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली, तर सातारा येथील संस्थेचे दृकश्राव्य सादरीकरण पाहिले. तीनही संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी व कार्यक्षमता यांचा विचार करून समितीने सर्वानुमते मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर या संस्थेची शिफारस केली आणि महामंडळाने त्याला मान्यता दिली.

स्थळ निवड समितीमध्ये यांचा होता सहभाग
स्थळ निवड समितीमध्ये साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, उपाध्यक्ष रमेश बंसकर तसेच प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनिताराजे पवार आणि डॉ. नरेंद्र पाठक यांचा समावेश होता. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. याप्रसंगी प्रकाश पागे, प्रा. मिलिंद जोशी, जे. जे. कुलकर्णी, दादा गोरे, दगडू लोमटे, डॉ. विद्या देवधर, अ. के. आकरे व प्रकाश गर्गे हे सदस्य उपस्थित होते.

अमळनेरसाठी यांनी केला शिक्कामोर्तब
पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत, महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस समिती सदस्यांव्यतिरिक्त प्रकाश पागे, प्रा. मिलिंद जोशी, जे. जे. कुलकर्णी, दादा गोरे, दगडू लोमटे, डॉ. विद्या देवधर, अ. के. आकरे व प्रकाश गर्गे हे सदस्य उपस्थित होते. त्यांनी अमळनेर येथे साहित्य संमेलन घेण्यावर शिक्कामोर्तब केला.

1952 नंतर मिळाला बहुमान
1952 मध्ये साहित्य संमेलन घेण्यात आले होते. त्यानंतर आता अमळनेरला दुसर्‍यांदा 2024 मध्ये त्याच प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर साहित्य संमेलन होत आहे. 1952 च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी होते. त्या संमेलनास प्र. के. अत्रे , ना. सि. फडके , कवी माधव ज्युलियन, द. वा. पोतदार, रावसाहेब नांदेडकर , मो. द. ब्रम्हे , रामचंद्र भांडारकर आदी मान्यवरांनी हजेरी लावून संमेलन यशस्वीपणे पार पडले होते. तर आता होणार्या संमेलनाची ही मोठी उत्सुकता लागून आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !