भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार हरीभाऊ जावळेंची निवड


जळगाव : भाजपा भुसावळ शहराध्यक्ष व तालुकाध्यक्षपदाच्या निवडीवरून भाजपाच्या बैठकीत भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांना धक्काबुक्की झाल्यानंतर तसेच शाई फेकल्याच्या प्रकारानंतर रावसाहेब दानवे यांनी सभेतून काढता पाय घेतला होता तर माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेत वादावर पडदा टाकल्यानंतर पुन्हा बंदद्वार बैठक घेण्यात आली व त्यात 18 पैकी एकूण नऊ जण रींगणात असल्याने त्यांची माजी मंत्री महाजनांनी समजूत काढली. अखेर भाजपा जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी माजी आमदार हरीभाऊ जावळेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले व तशी घोषणा माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली.

अखेर हरीभाऊ जावळे यांची बिनविरोध निवड
भाजपा जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदावर कुणाच वर्णी लागणार? याकडे लक्ष लागून असतानाच शुक्रवारी भुसावळातील पदाधिकारी निवडीवरून वादंग झाल्यानंतर पेच निर्माण झाला मात्र माजी आमदार हरीभाऊ जावळे, भुसावळचे अजय भोळे, डॉ.संजीव पाटील, पोपट भोळे, पी.सी.पाटील, आमदार स्मिता वाघ यांच्यातून माजी आमदार हरीभाऊ जावळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. निवडीनंतर माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेव दानवे, माजी मंत्री गिरीश महाजन, खाासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, आमदार चंदूलाल पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार स्मिता वाघ, जिल्हा परीषद अध्यक्ष रंजना पाटील, डॉ.संजीव पाटील यांच्या सह मान्यवरांनी माजी आमदार हरीभाऊ जावळे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.


कॉपी करू नका.