तर विधानसभा निवडणूक लढवणार नाही : आमदार चंद्रकांत पाटील यांचे खडसेंना खुले आव्हान !

Will not contest assembly elections : MLA Chandrakant Patil’s open challenge to Khadse! कुर्हाकाकोडा : आमदार एकनाथ खडसे यांनी एखाद्या जिल्हा परीषद गटात रोहिणी खडसे यांना माझ्या कार्यकर्त्याविरोधात उभे करावे, माझा कार्यकर्ता पराभूत झाल्यास मी विधानसभा लढणार नाही, असे खुले आवाहन आमदार चंद्रकांत पाटील यांनी येथे दिले. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा प्रचाराच्या शुभारंभ कुर्हा येथील पुरणमल चौधरी यांच्या जिनिंग प्रेसमध्ये आयोजित मेळाव्याने झाला. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी आमदार खडसे यांच्यावर टिका केली.
कोथळीत तरी आहे का सरपंच ?
अशोक कांडेलकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांना धारेवर धरीत बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी पहिली बोली दहा लाखांची लागली असल्याचा आरोप केला. गेल्या तीस वर्षांत झाला नाही तो विकास आमदार चंद्रकांत पाटील करीत आहेत. मुख्यमंत्री यांच्यापासून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून विकास होत असून कोथळीचा सरपंच तरी नाथाभाऊंचा आहे का ? असा सवाल त्यांनी केला. यावेळी डॉ.राजेंद्र फडके, नवनीत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यांची मेळाव्याला उपस्थिती
यावेळी समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, पुरणमल चौधरी, दूध संचालक मधुकर राणे, पंचायत समिती सदस्य राजू सवळे, विनोद पाटील, बोदवड नगराध्यक्ष आनंदा पाटील, भालचंद्र कुलकर्णी, विवेक जवरे, डॉ.उद्धव पाटील, स्वीय सहा.प्रशांत पाटील, नारायण पाटील, डी.ओ.पाटील, विनोद पाटील, अनंत पाटील, रशीद तडवी, शिवाजी पवार, अविनाश वाढे, राहुल खिरळकर, पंकज धाबे, मंगेश पाटील, दीपक वाघ, ज्ञानेश्वर तायडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.