दंतेवाडात आयईडी स्फोटाने पोलिसांचे वाहन उडवले : 11 जवान शहिद


IED blast blows up police vehicle in Dantewada : 11 jawans martyred छत्तीसगड : आयईडी स्फोट घडवून पोलिसांचे वाहन उडवण्यात आल्याने या घटनेत 11 जवान शहिद झाले. ही धक्कादायक घटना छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे बुधवारी घरली. पावसात अडकलेल्या सुरक्षा दलांना वाचवण्यासाठी जवान जात असताना ही दुर्घटना घडली. दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अरणपूर-समेलीदरम्यान हा हल्ला झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकही झाली आहे. या चकमकीदरम्यान माओवाद्यांनी वाहनावर बॉम्ब फेकले.

नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करणार
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या हल्ल्यावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले- दंतेवाडा येथे सुरक्षा जवानांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या आईडी हल्ल्यात जवान शहीद झाल्यामुळे आम्ही दु:खी आहोत. त्यांच्या कुटुंबीयांना माझ्या संवेदना. नक्षलवाद्यांना सोडले जाणार नाही.





2021 मध्ये झाला होता हल्ला
3 एप्रिल 2021 रोजी विजापूर जिल्ह्यातील ताररेम पोलीस स्टेशन क्षेत्रातील टेकलगुडा येथे झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले होते, 35 हून अधिक जखमी झाले होते. त्यांच्यावर 350 ते 400 नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये माओवाद्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती. जवानांवर मोठ्या प्रमाणात बीजीएल (बॅरल ग्रेनेड लाँचर) फायरिंग करण्यात आली होती. यासोबतच डीआरजी, सीआरपीएफ, कोब्रा बटालियनच्या जवानांकडून शस्त्रेही लुटण्यात आली होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !