शिरपूर आरटीओ चेक पोस्टवर ट्रकमधून पावणेदोन लाखांचा गुटखा जप्त : राजस्थानच्या चालकाला अटक


Gutkha worth Rs 2 lakh seized from truck at Shirpur RTO check Post : Driver from Rajasthan arrested

शिरपूर : शिरपूर तालुका पोलिसांनी राज्य सीमा तपासणी नाक्याजवळ एका वाहनातून होणारी गुटखा तस्करी उघडकीस आणत एक लाख 87 हजार 200 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय सुरेश शिरसाठ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
अन्न व औषध प्रशासन विभागाचे किशोर बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक बिजेंद्रसिंग रामबाबु मीना (31, रा.भिरामद, ता.सरमदला, राजस्थान) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांचे पथक नियमित गस्तीवर असतांना हाडाखेड येथील राज्य सीमा तपासणी नाक्याजवळ संशयीत ट्रक आर.जे.जी.बी.1242 आल्यानंतर पथकाने त्याची तपासणी केली असता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला एक लाख 87 हजार 200 रूपये किंमतीचा गुटखा आढळला. पथकाने गुटख्यासह 15 लाखांचे वाहन मिळून 16 लाख 87 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास उपनिरीक्षक कृष्णा पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !