खोदकामात सापडलेले सोने स्वस्तात देण्याचा बहाणा : भुसावळात परप्रांतीय भामटे जाळ्यात
भुसावळ पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची कारवाई : व्यापार्याची टळली फसवणूक
The pretext of giving away the gold found in the excavation cheaply: In Bhusawal, foreign scammers are caught in the net भुसावळ : शहरातील एका व्यापार्याकडे आलेल्या भामट्यांनी खोदकामात सोन्याच्या माळा सापडल्याचा बहाणा करीत एक किलो वजनाचे मणी पाच लाखात देण्याची तयारी दर्शवली मात्र व्यापार्याला संशय आल्यानंतर त्यांनी पोलीस उपअधीक्षकांना माहिती दिली व पोलिसांनी डमी ग्राहकाद्वारे सापळा रचत आरोपींच्या मुसक्या बांधल्या. ही कारवाई शिवपूर कन्हाळा रोडवरील द वर्ल्डजवळ शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. किसनलाल दौलतराम बागरी (36, रा.बल्लुर, ता.जि.सिरोही, राजस्थान) व बाबुलाल ओबाराम बागरी (42, रा.लक्ष्मी नगर, बिबल्सर, ता.जि. जालोद, राजस्थान) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.
स्वस्तात सोने देण्याचा बहाणा
राजस्थानातील संशयित मंदिरे विकण्याच्या बहाण्याने शहरात फिरत असताना शहरातील एका प्रथितयश व्यापार्याकडे पोहोचले व आम्हाला खोदकामात एक ते दिड किलो वजनाचे सोन्याचे मणी सापडल्याने ते पाच लाखात विक्री करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. नमून्यादाखल दोन ग्रॅमचे सोन्याचे मणी त्यांनी व्यापार्याला दिले व व्यापार्याने खातरजमा केल्यानंतर दिलेले मणी सोन्याचेच असल्याने व्यापार्याचा विश्वास बसला मात्र शंकेची पाल चुकचूकल्याने त्यांनी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याशी संपर्क साधल्याने अधिकार्यांनी हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे सांगत व्यापार्याला तक्रार देण्याचे सांगितले मात्र व्यापार्याने तक्रार न दिल्याने पोलिसांनी डमी ग्राहक तयार करीत संशयितांपर्यंत पाठवला व दोन लाखात एक किलो सोन्याचे मणी खरेदीचा सौदा ठरला.




व्यवहार होताच संशयित जाळ्यात
शनिवारी सायंकाळी डमी ग्राहकाकडे पाचशे रुपयांच्या चिल्ड्रन बँकेच्या दोन लाखांच्या नोटा एका बॅगेत दिल्यानंतर द वर्ल्ड स्कूलजवळ व्यवहार करण्याचे ठरल्यानंतर पथकाने सापळा रचला. शनिवारी सायंकाळी उशिरा संशयितांनी डमी ग्राहकाला बनावट सोन्याच्या माळा देताच व पैशांचा व्यवहार होताच पथकाने झडप घालून दोघांच्या मुसक्या बांधत तालुका पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी रमण सुरळकर यांच्या तक्रारीनुसार संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई भुसावळ पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुरज पाटील, यासीन पिंजारी, रमण सुरळकर आदींच्या पथकाने केली. दरम्यान, नकली सोने स्वस्तात देण्याच्या बहाण्याने टोळी कार्यरत असून कुणीही नागरीकांनी अशा व्यवहारांना व भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.