चाळीसगावच्या योगेश अग्रवाल यांचा रशियात भरलेल्या उद्योजक परीषदेत सहभाग
भारत व रशिया सरकारचा उपक्रम : निर्यात वाढल्यास शेतकर्यांना होईल फायदा
Participation of Yogesh Agarwal of Chalisgaon in Entrepreneurial Council held in Russia चाळीसगाव : भारत व रशिया सरकारच्या संयुक्त विद्यमाने मास्को व सेंट पीटर्सबर्ग येथे 24 ते 27 एप्रिल दरम्यान झालेल्या उद्योजक परीषदेत चाळीसगाव येथील युवा उद्योजक व आ.बं. मुलांच्या विद्यालयाचे चेअरमन योगेश अग्रवाल यांनी सहभाग घेतला. भारतातून रशियात शेतमालाची निर्यात वाढविल्यास शेतक-यांना मोठा फायदा होईल, असे मनोगतही अग्रवाल यांनी परीषदेत व्यक्त केले. भारत व रशिया या दोन देशांमध्ये आयात-निर्यात वाढीस लागावी. शेतमालास चांगला भाव मिळण्यासाठी परीषद घेण्यात आल.
परीषदेत 50 मान्यवरांचा सहभाग
परीषदेत भारतील उद्योजक व भारत सरकारमधील काही अधिकारी असे मिळून 50 मान्यवर सहभागी झाले. चार दिवस चाललेल्या या परीषदेत भारतीय उद्योजक विशेषतः योगेश अग्रवाल यांनी भारतातील शेतमालाची रशियात निर्यात व्हावी. हा मुद्दा ठळकपणे मांडला.




करारनामाही झाला
परीषदेला रशियातील भारताचे राजदूत पवन कपूर यांच्यासह रशियाच्या विदेश मंत्रालयाचे मंत्री सर्गे किरोमीन आदी उपस्थित होते. याच परीषदेत भारत-रशिया दरम्यान आयात-निर्यात करारनामाही झाला. यासोबतच विविध मुद्यांवर चर्चाही झाली. योगेश अग्रवाल हे गेल्या काही वर्षापासून शेतमालाशी संबंधित उत्पादनांची विविध देशात निर्यात करण्याच्या उद्योगात अग्रेसर आहेत.