तर पवारसाहेबही आपला निर्णय मागे घेतील : खासदार संजय राऊत


Pawarsaheb will also withdraw his decision: MP Sanjay Raut मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्यानंतर घोषणेनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून कार्यकर्ते भावूक झाले आहेत तर काहींना अश्रू अनावर झाले आहे. खसदार संजय राऊत यांनी यावर भाष्य करताना दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला आहे. गलिच्छ राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपांना कंटाळून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे… पण शिवसैनिकांच्या प्रेमापोटी त्यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला. बाळासाहेबांप्रमाणेच पवारसाहेबही राज्याच्या राजकारणाचा आत्मा आहेत… असे संजय राऊत यांनी म्हणत बाळासाहेबांप्रमाणेच शरद पवार हेही आपला निर्णय मागे घेतील, असे त्यांनी सूचवलं आहे.

साहेबांनी विश्वासात न घेता निर्णय घेतला
पवार साहेबांच्या निर्णयामुळे आपल्या सगळ्यांच्या भावना अतिशय ज्वलंत झाल्या आहेत. तुम्ही जसे स्तब्ध झाला, तसेच आम्हीदेखील आहोत. साहेबांनी कुणालाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतला आहे. तुमच्यासारखीच भावना आमचीही आहे. तुमच्या वतीने आम्हीही साहेबांना हात जोडून हा निर्णय मागे घेण्याची विनंती केल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.





नेत्यांनाही अश्रू अनावर
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी यावेळी तुमच्यामुळे आम्ही आहोत आणि पक्ष आहे, अशी भावना व्यक्त केली. आमदार धनंजय मुंडे यांनी तर पवारांचे पायही धरले. तर, प्रफुल्ल पटेल यांनीही, या निर्णयाची कल्पना नव्हती, असे म्हटले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !