पती घरात असतानाच मागच्या खोलीत विवाहितेची आत्महत्या : नेहरू नगरात हळहळ


Wife commits suicide in back room while husband is at home : Nehru Nagar जळगाव : शहहरातील नेहरू नगरातील रहिवासी असलेल्या 43 वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सायंकाळी पाच वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पूर्वा अमोल कोल्हे (43) असे मयत विवाहितेचे नाव आहे. विशेष म्हणजे विवाहितेचे पती व मुले पुढील हॉलमध्ये झोपले असताना विवाहितेच्या मागच्या घरात आत्महत्या केली तर स्टूल पडल्याचा आवाज येताच पतीला जाग आली हा प्रकार लक्षात आला.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
जळगावच्या नेहरू नगरात विवाहिता पूर्वा या पती व दोन मुलांसह वास्तव्यास होत्या. गुरूवारी पती व मुले घराच्या हॉलमध्ये झोपले असताना सायंकाळच्या सुमारास विवाहितेने गळफास घेतला. हा प्रकार पतीच्या लक्षात आल्यानंत रत्यांनी आरडा-ओरड केल्यानंतर शेजारी जमा झाले व त्यांच्या मदतीने पत्नीला खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात हलवले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी विवाहितेला मृत घोषित केले.


 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !