लढाऊ मिग 21 विमान कोसळताच दोन महिलांचा मृत्यू : राजस्थानमधील घटना
Air Force MiG-21 downed in Rajasthan’s Hanumangarh ; Two women killed, pilot safe नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान मिग-21 हे विमान राजस्थानात कोसळून झालेल्या अपघातात दोन महिला ठार झाल्या तर सुदैवाने वैमानिक बचावला. राजस्थानमधील हनुमानगड परिसरात सोमवारी सकाळी हा अपघात घडला. या घटनेत एक जण जखमी असून त्याची प्रकृती गंभीर आहे. सुरतगड येथून उड्डाण केल्यानंतर हा अपघात घडल्याची माहिती आहे.
आतापर्यंतचा आकडा सुन्न करणारा
1971 आणि 1999 चे युद्ध जिंकण्यात मिगचा महत्त्वाचा वाटा होता. पण भारतात गेल्या पाच दशकात 400 अपघातांमध्ये 200 वैमानिकांनाही जीव गमवावा लागला आहे. 2025 पर्यंत मिग-21 विमाने भारताच्या आकाशातून उतरवली जातील.




