Students from the state caught up in Manipur violence returned home मणिपूर हिंसाचारात अडकलेले राज्यातील विद्यार्थी मायदेशी परतले

आमदार चंद्रकांत पाटलांच्या पाठपुराव्याने बोदवडचा तरुणही परतला


Students from the state caught up in Manipur violence returned home भुसावळ : मणिपूरात उफाळलेल्या हिंसाचाराने आतापर्यंत 54 नागरीकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असतानाच भारतातील शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेचा मुद्दा समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात होती. महाराष्ट्र सरकारच्या मदतीमुळे मणिपूरमध्ये अडकलेले सर्व 25 विद्यार्थी मणिपूरमधून सुखरुप बाहेर पडले असून सध्या हे विद्यार्थी शासनाच्या मदतीने विमानाने गुवाहाटी या ठिकाणी पोहोचल्यानंतर सोमवारी रात्री मुंबईत दाखल झाले आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये बोदवड तालुक्यातील चिखली येथील मोहित खाडपे या विद्यार्थ्याचाही समावेश आहे. आदिवासी-बिगर आदिवासींमध्ये झालेल्या संघर्षात मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार उफाळल्यानंतर सर्वच विद्यार्थी हवालदिल झाले मात्र सरकारने दिलेल्या मदतीच्या हातामुळे या विद्यार्थ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.

विद्यार्थी मंगळवारी परतणार मूळ गावी
चिखली, ता.बोदवड येथील मोहित हा मणिपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी बी-टेकचे शिक्षण घेत आहे. तो बी-टेकच्या दुसर्‍या वर्षाला आहे. विद्यार्थ्याच्या माहितीनुसार, मणिपूरमध्ये ज्या ठिकाणी हिंसाचार सुरु आहे तो त्या ठिकाणाहून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर वास्तव्यास होता. सुरुवातीला ही घटना नियंत्रणात येईल म्हणून कुणीच मदत मागितली नाही. मात्र, हिंसाचार वाढत असून मोहित प्रमाणे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांनी याठिकाणाहून बाहेर पडण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारची मदत घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: या विद्यार्थ्यांशी बोलले. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल 25 विद्यार्थी याठिकाणी शिक्षणासाठी राहत होते, असेही त्याने सांगितले. मोहितसह अन्य विद्यार्थी मुंबईत सोमवारी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास दाखल झाले.

आमदार चंद्रकांत पाटील यांचा पाठपुरावा
मणिपूरमध्ये हिंसाचारानंतर मोहितला महाराष्ट्रात परत आणावे या संदर्भात मोहित खाडपे याच्या नातेवाईकांनी मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याजवळ मदत मागितली. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ यंत्रणा फिरवत त्यामुळे मणिपूरमध्ये देखील यंत्रणा कामाला लागली आणि विद्यार्थ्यांच्या परतीसाठी प्रयत्न सुरू झाले. या संदर्भात नातेवाईकांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले आहेत.


कॉपी करू नका.