आडगावात सामायीक बांधावरील गवत जाळतांना केळी पिकाला आग

Banana crop caught fire while burning grass on common dam in Adgaon यावल : तालुक्यातील आडगाव शेत शिवारामध्ये सामायीक बांधावरील एका शेतकर्याने गवत पेटवले आणि या पेटवलेल्या गवतामुळे शेजारील शेतकर्याच्या केळी पिकाला आग लागली. यात त्यांचे 70 केळीचे खोड जळाले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गवत पेटवताना केळीही पेटली
आडगाव, ता.यावल येथील रवींद्र साहेबराव पाटील यांचे आडगाव शेतशिवारात गट क्रमांक 273 हे शेत आहे. या शेतात त्यांनी केळी पिकाची लागवड केलेली आहे दरम्यान त्यांच्या शेजारील शेतकरी आरमान गंभीर तडवी यांनी पाटील यांच्या शेताच्या सोबत असलेल्या सामायीक बांधावरील गवत जाळले. या दरम्यान त्यांनी जाळलेल्या या गवतामुळे आग पाटील यांच्या केळी पिकात शिरली आणि त्यात त्यांचे 70 केळीचे खोड जळून खाक झाले व त्यात त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात आरमान तडवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान करीत आहे.


