अमळनेरात गॅसवरील ओमनीसह रीक्षा आगीत खाक

A rickshaw caught fire with a gas powered Omni in Amalner अमळनेर : शहरातील शारदा कॉलनीतील वड चौकाजवळ गॅसवर असलेल्या ओमनी वाहनाला आग लागल्यानंतर पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण केल्याने रीक्षाही पेटल्याने दोन्ही वाहने जळूक खाक झाली तर आगीचे झळ घरालादेखील बसल्याने सुमारे एक लाखाहून अधिक नुकसान झाले. ही घटना बुधवारी सकाळी सकाळी 10 वाजता घडली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
आगीचे नेमके कारण अस्पष्ट
शहरातील शारदा कॉलनीतील वड चौकातील बाबू गॅरेजवळ गोपाल दिनकर सोनार हे वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे ओमनी (एम.एच.18 बी.सी. 1289) असून पत्नीला घेऊन किराणा घेण्यासाठी ते बुधवारी सकाळी निघाल्यानंतर वाहन सुरू करतानाच स्टेअरींगजवळ स्पॉर्किंग होताच आग लागली व लागलीच आगीने रौद्र रूप धारण केल्याने रीक्षादेखील आगीच्या विळख्यात सापडली. नागरीकांनी अग्निशमन दलाला कळवल्यानंतर नितीन खैरनार, दिनेश बिर्हाडे, जफर खान, फारुख शेख, भिका संदानशीव, वसीम खान यांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुमारे एक लाखापेक्षा अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला.


