Jalgaon robbery जळगावच्या इतिहासात सर्वाधिक मोठा दरोडा : तीन कोटी 60 लाखांच्या सोन्यासह 17 लाखांची लूट


In the Jalgaon robbery, 17 lakhs were looted along with 6 kg gold worth three and a half crores जळगाव  : जळगावात स्टेट बँकेत पडलेल्या दरोड्यात तीन कोटी 60 लाखांचे सोने तर 17 लाखांची रोकड लांबवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघा हेल्मेटधारी दरोडेखोरांनी चॉपरचा धाक दाखवत कर्मचार्‍यांना ओलीस ठेवत तिजोरीतील 17 लाख 10 हजार 370 रुपयांची रोकड तसेच तीन कोटी 60 लाख रुपये किंमतीचे सहा किलो 16 ग्रॅम दागिणे लांबवल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हाभरात दरोडेखोरांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

सिनेस्टाईल दरोड्याने खळबळ
एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश करीत चौघा कर्मचार्‍यांच्या तोंडावर टेप लावून ओलीस ठेवले तर मॅनेजर बँकेत येताच त्यांच्यावर स्प्रे मारून तसेच मांडीवर चाकू मारून चाव्या मिळवत तिजोरीतील रोकडसह तारणे ठेवलेले तब्बल सहा किलो वजनाचे सोन्याचे दागिणे लांबवले





ग्राहक नसल्याची संधी साधून दरोडा
जळगावच्या कालिका माता मंदिर परीसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या नजीक स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. गुरुवारी सकाळी 9.10 वाजता बँक उघडल्यानंतर मॅनेजरसह कर्मचारी त्यांच्यासाठी असलेल्या छोट्या गेटने बँकेत दाखल झाले तर ग्राहकांसाठीचे मोठे गेट उघडण्यात आले नसल्याची संधी साधून हेल्मेटधारी दोघे दरोडेखोर बँक कर्मचार्‍यांसाठी असलेल्या मागील गेटने दाखल झाले. यावेळी सिक्युरीटी गार्ड व शिपायाने अडवल्यानंतर त्यांना चॉपर लावत धमकावून मारहाण करण्यात आली व एका बाजूला बसवण्यात आले. हा प्रकार पाहून बँक मॅनेजर पुढे सरसावताच त्यास जबर मारहाण करण्यात आली त्याच्या मांडीवर चॉपरने हल्ला करण्यात आला.

पोलीस अधिकार्‍यांची धाव
गुरुवारी सकाळच्या स्टेट बँकेत दरोडा पडल्यानंतर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, एलसीबी निरीक्षक किसनराव नजन-पाटील, शनीपेठचे निरीक्षक शंकर शेळके आदींसह सहकार्‍यांनी भेट देत माहिती जाणून घेतली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, भरदिवसा बँकेत पडलेल्या दरोड्याने पोलीस यंत्रणेवर टिकेची झोड उठली आहे. भरदिवसा चोर्‍या-घरफोड्या, दुचाकी चोरींचे सत्र सुरू असतानाच आता बँकेवर दरोडे पडू लागल्याने नागरीकांमध्ये मोठी भीती पसरली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !